Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण गेल्या तीन आठवड्यापासून एकाच विषयानं रान पेटवलंय.. तो म्हणजे अशोक खरात... आणि त्याचा कहाण्या.. लैंगिक अत्यांचाराचे व्हीडिओ.. त्यानंतर समोर आलेली त्यांची संपत्ती.. आणि कारनामे.. आजही अशोक खरात प्रकरणात अनेक नव्या गोष्टी समोर आल्यात.. त्यामुळे प्रकरणात नवा ट्वीस्टही येण्याची शक्यता आहे.. त्याशिवाय अशोक खरात प्रकरणात आज दिवसभरात काय काय घडलंय.. पाहुयात स्पेशल रिपोर्ट..लैगिंक वासनांध..कारनाम्यांपासून सुरु झालेल्या खरात फाईल्समध्ये..दिवसागणिक नवनवीन गोष्टी पुढे येतायेत..आणि प्रत्येक गोष्ट ही पहिल्या प्रकरणापेक्षा अति भंयकर आहे...म्हणून की काय..आधी शिर्डी पोलीस.. नंतर नाशिक पोलीस...त्यानंतर विशेष तपास पथक.. आयकर विभाग...यासगळ्यांकडून खरातची पाळंमुळं उकरुन काढली जात असतानाच..प्रकरणात ईडीची एन्ट्री होणारय..अशोक खरात प्रकरण समोऱ आल्यापासून..मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीसांनी विशेष पथकाची स्थापना असो..की कारवाईसाठी दिलेली मुभा असो..कोणतीही तडजोड करणार नाही..अशीच सरकारची भूमिका आहे..हे वेळोवेळी दाखवून दिलंय.आजही जेव्हा खरातच्या नाशिक आणि शिर्डीमधील मालमत्ता.. त्याशिवाय सिन्नर तालुक्यातील समता पतसंस्थेतील 100 खाती..तर जगदंबा पतसंस्थेत असलेल्या 32..असा एकूण 132 खात्यांमध्ये अशोक खरात नॉमिनी.. म्हणजे वासरदार आहे..त्याच खात्यांमधून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा संशय आहे..आणि त्यामुळेच प्रकरणात ईडीची एन्ट्री होतीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola