Anant Ambani Watch : अनंत अंबानींसाठी तब्बल १४ कोटींंचं घड्याळ, काय आहे वैशिष्ट्य? Special Report

Anant Ambani Watch : अनंत अंबानींसाठी तब्बल १४ कोटींंचं घड्याळ, काय आहे वैशिष्ट्य? Special Report

हे घड्याळ पाहिल्यानंतर ते कुणाच्या मनगटावर दिसणार आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही...अनंत अंबानींच्या कलेक्शनमध्ये कोट्यवधी रूपयांची घड्याळं आहेत....आणि त्या कलेक्शनमध्ये आता या १४ कोटी रूपयांच्या घडाळ्याची भर पडली आहे...अनंत अंबानींचं वनतारावरचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे...म्हणूनच जेकब अँड कंपनीनं घड्याळ तयार करताना वनताराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राण्यांच्या प्रतिकृतीचा वापर केलाय...आणि त्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या अनंत अंबानींना केंद्रस्थानी ठेवलंय.हे घड्याळ रत्नजडीत असून त्यासाटी ३९७ हिऱ्यांचा वापर करण्यात आलाय... अनंत अंबानी यांनी त्याच्या लग्नात घातलेल्या घड्याळाची देखील सर्वत्र चर्चा होती...फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गपासून अनेक बडे आसामी त्या घड्याळाच्या प्रेमात पडले होते.अनंत अंबानी यांच्याकडे असलेल्या महागड्या घड्याळांची किंमत २०० कोटींच्या घरात आहे.ज्यात पाटेक फिलिप, रिचर्ड मिले, ऑडोमार्स पिगे आणि जेकब अँड कंपनीच्या घड्याळाचा समावेश आहे...असं म्हणतात हौशेला मोल नसतं..आणि जर ती हौस जगातल्या गर्भश्रीमंतांमध्ये गणल्या जाणाऱ्या आसामीची असेल तर विचारायलाच नको....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola