Akshay Laxman Majha Maha katta : माईंड रिडरची लाईव्ह कार्यक्रमात ज्ञानदा कदमवर जादू,पुढे काय झालं?

Continues below advertisement

Akshay Laxman On ABP Majha Maha Katta : कुणाच्या मनात नेमकं काय चाललंय त्याचा अंदाज बांधनं हे जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट. मात्र अंतरमनाचा ठाव घेणारी अशीच एक कला माईंड रिडर अक्षय लक्ष्मण (Magician Akshay Laxman) यांच्या ठाई आहे. एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) बोलताना अक्षय लक्ष्मण यांनी याच शास्त्राचं गमक आणि एकंदरीत आपल्या आयुष्याचा उलगडा केला आहे. सोबतच आपल्या जादुई कलेची सफरही घडवून आणली आहे.

Akshay Laxman Majha Maha katta : वयाच्या 6 व्या वर्षापासून सुरवात, 30 वर्ष अविरतपणे थक्क करणारा प्रवास

माईंड रिडर अक्षय लक्ष्मण माझाच्या महाकट्यावर येताच त्यांनी राजीव खांडेकर (Rajiv Khandekar) सरांना 52 पत्त्यातील एक कार्ड मनात ठेवायला सांगितलं आणि नंतर तो अचूकपणे ओळखून दाखवत आपल्या जादुई सफरची चुणूक घडवून आणली. त्यांनतर आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडतांना त्यांनी सांगितलं कि, त्यांनी जादूंच्या कार्यक्रमातून वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरुवात केली. विरंगुळा म्हणून सुरुवात केलेला हा प्रवास आज जवळ जवळ 30 वर्ष अविरतपणे सुरु असल्याचे त्यांनी सांगितलं. तर पुढे बोलताना त्यांनी अमीर खान यांच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातील सलमान खान यांच्यासोबतचे धम्माल किस्से सांगत आठवणींनी उजाळा दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola