Palghar Tragedy | बोईसरमध्ये खड्ड्यातल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा दुर्दैवी अंत
पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एका दुर्दैवी घटनेत तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. गणेशनगर परिसरातील खासगी जागेवरील खड्ड्यातल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. मृत मुलांमध्ये सूरज यादव, धीरज यादव आणि अंकिता गुप्ता यांचा समावेश आहे. दोन सख्ख्या भावांचाही या दुर्घटनेत समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.