Farmers Protest : शेतकरी आंदोलनासाठी वर्षभर दिल्लीत, महाराष्ट्रातील प्रतिभा शिंदेंचा थरारक अनुभव

कृषी कायद्यांविरोधात तब्बल 378 दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन (Farmers Protest) मागे घेतल्याचे शेतकरी नेत्यांनी नुकतेच जाहीर केले. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी शेतकरी आंदोलन (Farmers Protest) संपवण्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनात महिला शेतकऱ्यांचाही मोठा सहभात होता. त्यातीलच शेतकरी नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी या आंदोलनातील काही अनुभव सांगितले आहेत. प्रतिभाताई या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सिंघू बॉर्डरवर तळ ठोकून बसल्या होत्या. आंदोलन चिरडण्यासाठी अनेक कट-कारस्थाने झाली. वाटेत खिळे ठोकण्यापासून ते शेतकऱ्यांच्या अंगावर पाणी मारणे. अशी एक ना अनेक  कारस्थाने झाली परंतु, महाराष्ट्राची ही वाघीन मागे हटली नाही.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola