Bollywood Drug Connection | ड्रग्जप्रकरणी बॉलिवूडमधील तीन मोठी नावं NCBच्या रडारवर, कोण आहेत S A R?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टानं राखून ठेवला. लवकरात लवकर यावर निकाल जाहीर करू असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. दरम्यान सुशांत सिंह आता हयात नाही, मग तो ड्रग्ज कुणाकडनं घेत होता, हे कसं सिद्ध करणार?, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. एनसीबीनं या सर्व जामीन अर्जांना जोरदार विरोध केला. एनडीपीएस कायद्याअंतर्गत ड्रग्जच्या व्यापाराचे आरोप असणा-यांकडनं मुद्देमाल हस्तगत करण्याची गरजचं नाही. असं स्पष्ट करत साल 1985 मध्ये या कायद्याची निर्मिती याचसाठी करण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola