Maharashtra vs Karnataka : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची सीमेवर कसून तपासणी
Maharashtra vs Karnataka : महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असला तरी पोलीस खात्याने बेळगाव जिल्ह्याच्या सगळ्या सीमेवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत.राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील विविध तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आल्या असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.