Vasai Fire | देवपूजेसाठी लावलेलं धूप जीवावर बेतलं, अग्नितांडवामुळे संपू्र्ण घराची झाली राख | वसई

 धूप पेटल्यानं संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळी, सकाळी देवाच्या पाया पडताना आपण सर्वच जण धूप किंवा अगरबत्ती पेटवतो. मात्र धूप पेटवताना किंवा पेटवल्यानंतर योग्य ती काळजी घेतली नाही तर काय संकट ओढवू शकतं याची प्रचिती मुंबईजवळच्या वसईमध्ये आली आहे. वसईमध्ये धुपानं पेट घेतला आणि त्यानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घरच कवेत घेतलं. वसईच्या एव्हरशाईन परिसरातल्या स्टार रेसिडन्सीमधली ही घटना आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरच्या घरातलं सामान आगीत जळून खाक झालंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola