Lonar Lake | प्रसिद्ध लोणार सरोवराचं पाणी अचानक गुलाबी! सरोवर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
Continues below advertisement
आज जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झालंय, लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रुप पाहण्यासाठी गर्दी केली. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले, तर याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झालंय. दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचे संशोधन सुरू आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
Continues below advertisement