Pune School : पुण्यात उद्यापासून शाळा सुरू होणार,शाळा प्रशासनाकडून खास तयारी सुरू ABP MAJHA
पुणे शहरातील शाळा उद्यापासून सुरू होणार. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. कोरोनाच्या ओमयक्रोन व्हेरिएन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून यासाठी खास तयारी केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग मेंटेन करुन विद्यार्थ्यांन साठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळे वर्ग स्वच्छ केले जात आहेत. सॅनिटायझर ची फवारणी सुद्धा केली जात आहे. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी प्रायमरी स्कूल मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास तयारी केली जात आहे
Tags :
Maharashtra Mumbai Pune मुंबई पुणे महाराष्ट्र School शाळा School Started मुंबई शाळा महाराष्ट्र पुणे शाळा सुरू