Inflation : पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून सरकार मालामाल,सरकारनं तब्बल 8.02 लाख कोटी कमावले ABP MAJHA
Continues below advertisement
इंधन महागाईनं जनता हैराण आहे. पेट्रोल आणि डिझेलसुद्धा सोन्याच्या भावानं विकले जातायत. पण या पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून सरकार मात्र मालामाल झालंय. गेल्या तीन वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील करांतून सरकारनं तब्बल ८.०२ लाख कोटी रुपये कमावले आहेत. त्यातली सुमारे अर्धी रक्कम म्हणजे ३.७१ लाख कोटी रुपये गेल्या आर्थिक वर्षांत कमावले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत ही माहिती दिली. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि सेस यातून सरकारला मोठं उत्पन्न मिळालं आहे.
Continues below advertisement