Anjneri | स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतर अंजनेरी पर्वतावरील प्रस्तावित रस्ता रद्द!
Continues below advertisement
हनुमानाचं जन्मस्थान असणाऱ्या अंजनेरी गडावर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने 14 किलोमीटरचा रस्ता होणार होता, पर्यटन विकासासाठी रस्ता करण्याचा घाट घातला जात होता. पर्वताच्या मागील बाजूस असणाऱ्या मुळे गावातून रस्त्याचा मार्ग होता.या रस्त्यासाठी 17 हेक्टर वनक्षेत्र उध्वस्त होणार होते. या पर्वतावर दुर्मिळ जैवविविधता आहेत नामशेष होणाऱ्या शेकडो वनस्पती आहेत या सर्व वनस्पती नष्ट होतील म्हणून पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केला होता. पर्यावरण प्रेमीच्या या विरोधाचा एबीपी माझा आवाज बनला आणि सरकार पर्यन्त ही ग्रहणी मांडली पर्यावरण, मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत रस्त्याच्या प्रकल्पावर फुली मारली आहे. पर्यावरणाला इजा पोहचेल असा विकास करणार नाही.
Continues below advertisement