Maratha Mashal Morcha | मशाल मोर्चा दडपण्याचा प्रयत्न,पोलीस ठाण्यात डांबल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पंढरपूरहून मुंबई येथे पायी वारी करत आक्रोश आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पंढरपूर येथे पायी वारी करण्यास सरकारने मज्जाव केला होता आणि त्यानंतर पंढरपूर हून कार ने या आक्रोश आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना घेऊन पोलिस बंदोबस्तात पुण्यात हे कार्यकर्ते दाखल झाले, मराठा समाजाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी हे वारी आक्रोश आंदोलन करणयात येत होते.पुण्यातल्या कौन्सिल हॉल येथे राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत आक्रोश आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या ठिकाणी हे कार्यकर्ते मुख्य सचिवांना निवेदन देणार असून मुख्य सचिवांकडून काय आश्वासन मिळते त्यावर पुढची दिशा ठरवली जाईल असं या आंदोलकांकडून सांगण्यात आले दरम्यान आक्रोश आंदोलन करते कौन्सिल हॉल याठिकाणी येणार असल्याने मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त पुण्यातल्या कौन्सिल हॉल बाहेर लावण्यात आला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola