Omicron : कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट 25 देशांमध्ये पसरलाय ABP Majha
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट 25 देशांमध्ये पसरलाय. अजूनही याचा प्रसार वाढेल असा इशारा WHO ने दिला आहे.. ओमायक्रॉन व्हेरियंटचा शोध लागण्याआधीच त्याचा भारतात प्रसार झाला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशात तो आढळला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं आयसीएमआरच्या डॉक्टर समीरण पांडा यांनी म्हटलंय. आफ्रिकन देशांत ओमायक्रॉनचं अस्तित्व पहिल्यांदा ९ नोव्हेंबरला आढळलं. दक्षिण आफ्रिका आणि अन्य देशांतून काही महिन्यांत अनेक प्रवासी जगभरात गेले आहेत. त्यांच्यापैकी काही जणांना बाधा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही हा विषाणू आढळून येऊ शकतो, असं डॉक्टर पांडा यांनी म्हटलंय. सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये ओमायक्रॉनची बाधा झालेला प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आफ्रिकन देशांत ओमायक्रॉनचे अस्तित्व पहिल्यांदा ९ नोव्हेंबर रोजी आढळले. पांडा म्हणाले की, दक्षिण आफ्रिका असो वा अन्य देश तिथून काही महिन्यांत अनेक प्रवासी जगभर गेले आहेत. त्यांच्यापैकी काही जणांना याची बाधा झाली असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हा विषाणू भारतातही आढळून येऊ शकते. त्याच्या संसर्गाचा वेग जास्त आहे. तर ओमायक्रॉनच्या मुद्द्यावर आज संसदेत चर्चा होणार आहे .