Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 02 डिसेंबर 2021 : गुरुवार : ABP Majha
Continues below advertisement
स्मार्ट बुलेटिन | 02 डिसेंबर 2021 | गुरुवार | एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
१. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी, कांद्यासह फळबागांचं नुकसान, साताऱ्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक चिंतेत, कोकणात आंबा पीक धोक्यात
Maharashtra Rain Update : Cyclone Jovad : एकीकडे अवकाळी पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे हवामान खात्यानं आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता 'जोवाड' चक्रीवादळ (Cyclone Jovad) येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती 3 डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, आज-उद्याही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज
३. कुणी लढतच नसेल तर आम्ही काय करणार? पवारांसमोरच ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला, काँग्रेस नेत्यांकडूनही जळजळीत प्रतिक्रिया
४. विमान प्रवासाबाबत राज्यानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राचा आक्षेप, तर 15 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर
५. कोरोना संसर्गापासून वाचवणाऱ्या च्युइंगमचा शोध लागल्याची चर्चा, 95 टक्के कोरोना पार्टिकल तोंडातच ट्रॅप करण्याची क्षमता
६. नोकरभरती पेपरफुटी प्रकरणी औरंगाबादेतून एकाला अटक, 31 ऑक्टोबरचा आरोग्य विभागाचा पेपर व्हायरल केल्याचा ठपका
७. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन, जिल्ह्यात शोककळा, सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध
८. साहित्य सम्मेलनापुढं अडचणींचा 'पाऊस', आधी वाद, मग ओमिक्रॉन आता अवकाळी पावसाचं संकट!
९. मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये उबेर कंपनीकडून एका विद्यार्थ्याला दोन कोटी 5 लाखांचं पॅकेज ऑफर, मुंबई आयआयटीच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वाधिक वार्षिक पॅकेज
१०. उद्यापासून मुंबईच्या वानखेडेवर रंगणार न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी, विराट कोहली परतणार, अंतिम 11 मधून कोण आऊट होणार याकडे लक्ष
Continues below advertisement