महात्मा फुले आरोग्य योजनेत काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासंदर्भात प्रयत्न करू-आरोग्यमंत्री टोपे
केंद्र सरकारकडे आम्ही 5 हजार व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती. मात्र केंद्राकडून फक्त 277 व्हेंटिलेटर मिळाले आहेत. तसेच राज्यशासनाने एकमताने ठराव केला होता की वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्गाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा अंर्तगत मूल्यमापन करून गुण ठरवा मात्र प्रशिक्षित विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या. हे केंद्र शासन करू शकतं, हा संपूर्ण देशासाठी महत्वाचा निर्णय होईल. मात्र केंद्र सरकार हे लवकर करत नाहीये असा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. उलट हे न करण्याचे काम सध्या सुरू आहे.