Pune Lockdown Rumors | पुणे पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचा मेसेज खोटा, महापौर मोहोळांकडून स्पष्ट
पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पुन्हा लॉकडाऊन केले जाण्याची शक्यता असल्याची क्लिप व्हायरल होत आहे, मात्र ही अफवा असून लॉकडाऊन बाबत कोणताही निर्णय झालेला नाही, पुणे शहरात लॉकडाऊन होणार नाही असे स्पष्टीकरण पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातील माध्यमातील जुनी क्लिप व्हायरल होत आहे, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन महापौरांनी केलंय.
Tags :
Mayor Pune Pimpri Chinchwad Lockdown Pune Mayor Lockdown In Pune Murlidhar Mohol Pune Lockdown Deputy CM Ajit Pawar Coronavirus