Palghar : पालघरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्याला तब्बल सव्वा लाखांचं वीजबिल

Continues below advertisement

पालघरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्याला तब्बल सव्वा लाखांचं वीजबिल पाठवण्यात आलंय. त्यामुळे महावितरण कंपनीचा मनमानी आणि भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय. वार्षिक उत्पन्न अवघं २० हजार रुपये
असलेल्या कुटुंबाला महावितरणनं तब्बल १ लाख २९ हजारांचं बिल पाठवलंय. डहाणूतील धानीवर कोटबीपाडा इथल्या अजीस बाबू गायकर यांच्या घरात अवघे तीन बल्ब आणि एक फॅन आहे. एरवी त्यांना ३०० ते ६०० रुपये बिल येतं. पण सप्टेंबर महिन्याचं बिल मात्र तब्बल एक लाख २९ हजार रुपये इतकं आलंय. याशिवाय अन्य काही ग्राहकांना २६ हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत बिलं पाठवण्यात आलीत. संतापजनक बाब म्हणजे याबाबत महावितरणच्या कार्यालयात खेटे मारूनही त्यांना कुणी दाद देत नाहीय.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram