Honey Adulteration | तुम्ही भेसळयुक्त मध वापरता? देशातील प्रमुख ब्रॅण्डच्या मधात भेसळ, CES चा अहवाल

Continues below advertisement
नवी दिल्ली : मधाला अमृततुल्य समजलं जातं. याचा औषधी गुणधर्म आहे. परंतु यामध्ये भेसळ केली जात असल्याचं समोर आहे. महत्त्वाचं म्हणजे ब्रॅण्डेड कंपन्यांच्या मधात भेसळ होत असल्याचं सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्वायरन्मेंटने म्हटलं आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय बाजारात विक्री होत असलेल्या मधाच्या जवळपास सर्वच ब्रॅण्डमध्ये सारखेचा पाक वापरला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मधात शुगर सिरपची भेसळ हा खाद्य घोटाळा असल्याचं सुनीता नारायण म्हणाल्या. दरम्यान याच संस्थेने 2003 ते 2006 दरम्यान सॉफ्ट ड्रिंगमध्ये कीटकनाशके असल्याचं म्हटलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram