Love Marriage Issue | मंगळवेढ्यात पळून जाऊन लग्न केल्याने मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण
गावतील मुलीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून मुलाच्या वडीलांना गावात भर चौकात झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याचा अमानुष आणि धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे घडला आहे. दरम्यान पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून मारहाण झालेल्या बापाने सध्या पोलिसात याप्रकरणी 9 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातदेखील जातीचा वाद असून मुलगा व मुलगी भिन्न जातीमधील आहेत.