New Born Baby Border :भारत-पाक सीमेवर बाळाचा जन्म; नावं ठेवलं बॉर्डर ABP MAJHA

Continues below advertisement

अटारी सीमेवर 70  दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या जोडप्यानं २ डिसेंबरला एका बाळाला जन्म दिला... आणि आई-वडिलांनी त्याचं नाव बॉर्डर ठेवलं. पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यात राहणारे बलम राम आणि निंबू बाई हे जोडपं तीर्थ यात्रेसाठी भारतात आलं होतं. मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ते पाकिस्तानात परतू शकलं नाही. गेल्या 70 दिवसांपासून ते 97  नागरिकांसह अटारी सीमेवरच राहताहेत. अशातच निंबू बाई यांनी बाळाला जन्म दिला. सीमेवर जन्म झाल्यानं बाळाचं नाव बॉर्डर ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला... आणि हेच नाव आता सध्या चर्चेचं विषय ठरतंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram