पुढच्या वर्षीपासून तुमच्या हातात कमी पगार येऊ शकतो, कर्मचाऱ्याचं मूळ वेतन आता किमान 50% होणार
Continues below advertisement
कोरोना आणि लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या नोकरदार वर्गाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून देशात नवीन वेतन नियम लागू होणार आहे. या नव्या नियमामुळे फक्त प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी बरोबरच हातात येणाऱ्या पगारावरतीही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी संसदेत वेज कोड विधेयक मंजूर केलं होतं. ते आता पुढील वर्षीपासून लागू होणार आहे.
Continues below advertisement