मुख्यमंत्र्यांकडून सातारा, रत्नागिरी, पुण्यातील विकासकामांचा आढावा,पोफळी,कोयना येथील प्रकल्पांना भेट
सातारा जिल्ह्यातील कोयनानगर मुख्यमंत्री येणार म्हटल्यानंतर अनेक संस्था आपले प्रश्न घेऊन, निवेदन घेऊन आल्या होत्या. त्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांचा देखील सहभाग होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणाची पाहणी केल्यानंतर थेट सगळे कार्यक्रम रद्द करून हेलिपॅड गाठलं त्यामुळे याठिकाणी आलेल्या महिलांनी संताप व्यक्त केला.