ABP News

Barvi Dam | ठाणे जिल्ह्याची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली, बदलापूरचं बारवी धरण काठोकाठ भरलं!

Continues below advertisement

गेल्या वर्षी ४ ऑगस्ट रोजी हे धरण भरून वाहू लागलं होतं. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसानं दडी मारल्यामुळे ४ ऑगस्ट रोजी या धरणात अवघा ४८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर पाणीकपातीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र ऑगस्ट महिन्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे ऑगस्ट महिन्याअखेर हे धरण काठोकाठ भरलं आहे. आज धरण भरल्यानंतर स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासह एमआयडीसी अधिकाऱ्यांनी या धरणावर जाऊन जलपूजन केलं. यंदा धरण काहीसं उशिरा भरलं असलं, तरी त्यामुळे पाणी जास्त काळ टिकणार असून पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे ठाणे जिल्ह्याला वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram