Thane Toll Naka : ठाण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी, टोल आकारणार?
ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. ठाण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झाली होती. तीन हात नाकापासून मुलुंडपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर या वाहतूक कोंडीचा फटका मंत्री उदय सामंत यांनाही बसलाय. त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता.