Thane NCP Clash : ठाण्यात राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवारांच्या समर्थकांमधला वाद आता विकोपाला

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवार आणि अजित पवारांच्या समर्थकांमधला वाद आता विकोपाला गेला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांची पत्नी सोनल परांजपे यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. जितेंद्र आव्हाड समर्थकांना आपल्या बाजूनं या नाहीतर बघून घेऊ अशा फोनवरून धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola