Thane Boy Death :  ठाण्यातील मनपा शाळेत एका विद्यार्थ्याच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूचं प्रकरण तापलं

Continues below advertisement

 ठाण्यातील महापालिका शाळेत एका विद्यार्थ्याच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूचं प्रकरण खूपच तापलं आहे. या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी त्याच्या संशयास्पद मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी आज शाळेत येऊन आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शाळेतल्या इतर मुलांच्या पालकांनीही झाल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळं शाळेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी ठाणे महापालिका शिक्षणाधिकाऱ्य़ांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. त्या समितीनं चौकशी करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात पोलिसांना अजूनही शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पण त्याआधी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सखोल तपास सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram