Thane : ठाण्यात मद्य विक्रीवर राज्य उत्पादन शुल्काची नजर
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या पार्टीचं आयोजन करणाऱ्या ठाणेकरांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही करडी नजर राहणार आहे. बेकायदेशीर मद्यविक्री, मद्यनिर्मिती आणि मद्यतस्करीसोबतच विनापरवाना मद्य पार्टी आयोजित करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी पाच भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे शहर आणि जिल्ह्यात नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त पार्ट्यांचं आयोजन करणाऱ्यांनी मद्य प्राशन करण्याचा परवाना घेणे आवश्यक आहे. मोठ्या व्यावसायिक पार्टीसाठी २२ हजार तर लहान व्यावसायिक पार्टीसाठी ११ हजार रुपयांचं शुल्क आहे.