Thane Mumbra Nalesafai : नाल्याचं पाणी रस्त्यावर, मुंब्य्रात ठाणे पालिकेच्या नाले सफाईची पोलखोल
ठाण्यातील मुंब्रा येथे पावसाने ठाणे महानगर पालिकेच्या नाले सफाईची पोलखोल केली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील अमृतनगर मध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नाला ओसंडून वाहू लागला आहे. या नाल्याचे पाणी रस्त्यावर आले असून आजूबाजूच्या परिसरातील दुकानांमध्ये घुसले आहे. तसेच या नाल्यातील सर्व प्लास्टिक आणि कचरा हा रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे ठेकेदारांकडून किती उत्तम दर्जाचे काम नाले सफाई केली आहे हे या व्हिडीओ मधून दिसून येत आहे.