PM Modi on Uniform Civil Code : सामान नागरी कायद्याबाबत विषय काढला की विरोधक टीका करतात
देशात लवकरच समान नागरी कायदा आणणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात समान नागरी कायद्याचा विषय काढला. हा कायदा आणा, असं सुप्रीम कोर्ट वारंवार म्हणतंय. पण याचा विषय काढला की विरोधक आमच्यावर टीका करतात, असं मोदी म्हणाले. पसमंदा मुस्लिमांचं शोषण हे मुस्लिमांनीच केलंय, असं मोठं वक्तव्य देखील मोदींनी केलंय.