Thane News : ठाण्यातील कोपरी परिसरात अंडर पास देणार? अपघात टाळण्यासाठी स्थानिकांची मागणी
ठाण्यातल्या कोपरी येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीनंतर त्याठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे. पण याच पुलाच्या काही अंतरावर असलेल्या आनंदनगर जकात नाका परिसरात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळंच पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर येथील छेद रस्त्याला तात्पुरत्या स्वरुपात सिग्नल द्यावा आणि इथे कायमस्वरूपी ब्रिज बांधून हरी ओम नगर आणि कोपरीवासियांना अंडर पास द्यावा अशी मागणी हजारो नागरिक करतायत. पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा रिपोर्ट.