Thane : CM Shinde यांचा बर्थडे ठाणेकरांना गिफ्ट, Kopri Bridge चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाचं आज उद्घाटन होणारेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोपरी पूल खुला करण्यात येणारेय. कोपरी पुलाचे काम आता पूर्ण झाले असून आज या पुलाच्या सर्व मार्गिका आजपासून सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु होते. जुना पूल निकामी झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर मधला जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन दोन मार्गिका उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोपरी पूल सेवेत दाखल होत असल्याने, ठाणे आणि मुंबईकरांना हे मोठं गिफ्ट मिळणारेय. त्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कमी होण्यास मदतही होणारेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola