Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण
Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण
ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्धश्री किताबाने सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत... त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अधात्म आणि समाज परिवर्तनाचं काय गेली आठ दशके सुरू आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेबांनी केलंय. 2019 मध्ये एबीपी माझानंही माझा सन्मान देऊन आप्पासाहेबांना सन्मानित केलंय. आणि त्यांचं हेच कार्य त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी करत आहेत. दासबोधावरील श्रवण बैठकां महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेतच... शिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन याची दखल संपूर्ण जगानं घेतलीय... शिवाय रक्तदान शिबीर... स्वच्छता अभियान, स्मशान आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहीरींमधील गाळ काढून स्वच्छ करणे. .यासह अनेक कामे या माध्यमातून केली जातात. विशेष म्हणजे यापूर्वी ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनाही यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय.