Thane Diwali 2022 : ठाण्यात दिवाळीतही रस्सीखेच, ठाकरे गट शिंदे गटाचे वेगवेगळे कार्यक्रम
ठाण्यात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमातही तरुणाईनं गर्दी केली होती. शिंदे आणि विचारे गटांमध्ये यावेळी दिवाळी कार्यक्रमांत रस्सीखेच आहे. दोन्ही बाजूंकडे कार्यक्रमाची रेलचेल आहे आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना उपस्थिती लावली. तिथं लोकांची गर्दी दिसली. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमातही लोकांनी गर्दी केली होती.