Thane Crime : ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग, फरफटत नेतानाचं सीसीटीव्ही समोर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करतंय की या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या रिक्षावाल्याला तात्काळ शोधा आणि त्याला तुरुंगात डांबा... कारण या रिक्षावल्यानं कृत्यच तसं केलंय. ठाण्यातल्या स्टेशन रोड परिसरात घडलेल्या घटनेची ही दृश्य आहेत. ज्यात रिक्षावाला एका मुलीला फरफटत नेताना दिसतोय..शुक्रवारी सकाळी ७ वाजता एक विद्यार्थिनी बाजरपेठेत पायी जात होती. त्यावेळी रिक्षा चालकाने तिच्याकडून बघून अश्लील हावभाव केले. मुलीने जाब विचारला असता रिक्षा चालकानं तिचा हात पकडत तिला फरफटत नेलं... हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.. रिक्षाचालकानं फरफटत नेल्याने मुलीच्या हाताला दुखापत झाली आहे.. या रिक्षावाल्याला गजाआड करणं गरजेचं आहे... कारण हा जर मोकाट राहिला तर उद्या आणखी कोणत्याही तरुणी किंवा महिलेसोबत तो असा प्रकार करू शकतो.... तेव्हा पोलीस आता रिक्षावाला कधी गजाआड करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.