Thane Crime : पतीनं केली पत्नी आणि 2 मुलांची हत्या, अमित धर्मवीर बागडी असं आरपीचं नाव ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane Crime : पतीनं केली पत्नी आणि 2 मुलांची हत्या, अमित धर्मवीर बागडी असं आरपीचं नाव ABP Majha
ठाण्यात एका इसमानं आपली पत्नी आणि दोन चिमुरड्या मुलांच्या डोक्यात बॅटीनं घाव घालून त्यांची निर्घृण हत्या केली. कासारवडवली परिसरातल्या या हत्याकांडानं अख्खं ठाणं हादरलं आहे. आरोपीचं नाव अमित बागडी असून, तो २९ वर्षांचा आहे. अमितला दारुचं प्रचंड व्यसन असल्यानं, त्याची पत्नी भावना आपल्या दोन मुलांसह आपला दीर विकास बागडीच्या घरात राहात होती. अमितही तीन दिवसांसाठी त्याच्या घरी आला होता. विकास आज सकाळी सात सुमारास कामावर गेला होता. तो साडेअकराच्या सुमारास घरी परतला, त्यावेळी त्याला भावना आणि तिची दोन मुलं मृतावस्थेत आढळली. या प्रकरणात कासारवडवली पोलीस अधिक चौकशी करत आहेत.