Jitendra Awhad Karmuse Case : कर्मुसे मारहाण प्रकरणी तीन महिन्यात अहवाल सादर करा : SC चे आदेश

मंत्री असताना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन कर्मुसे यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता  अनंत करमुसे यांनी आव्हाड यांचे आक्षेपार्ह चित्र फेसबुकवर अपलोड केल्याने मारहाण केल्याचे आव्हाड यांनी म्हटले होते,  यासंदर्भात हाय कोर्टात अनंत करमुसे यांना फटका बसला होता, मारहाण प्रकरणाचा तपास सीबीआय सारख्या संस्थेकडून व्हावा किंवा याची सुनावणी महाराष्ट्राबाहेर व्हावी अशी मागणी करमुसे यांनी केली होती, मात्र हाय कोर्टाने ही मागणी फेटाळून केस निकाली लावली होती,  त्यामुळे करमुसे यांनी सुप्रीम कोटात याचिका दाखल केली होती जी मान्य करण्यात आली आणि 5 सुनावणी घेण्यात आल्या, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना अनंत करमुसे प्रकरणात पुढील तपास करण्याचे आदेश दिलेले असून तीन महिन्यात अहवाल दाखल करा, असे निर्देश दिले आहेत.        

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola