Sharad Pawar In Thane : मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात आज शरद पवारांची बैठक ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ठाणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज शरद पवारांची बैठक आहे. गणेश नाईक, निरंजन डावखरेंनी भाजपची वाट धरल्यानंतर पवारांनी जितेंद्र आव्हाडांना बळ दिलंय. निवडणुकीच्या तयारीसाठी ते आज ठाण्यात पोहोचले आहेत.