Ganesh Chaturthi 2022 : गणेश भक्तांची लूट करणाऱ्यांना आळा घालणार,उपमुख्यमंत्र्यांकडून आरटीओला आदेश
गणेशोत्सवासाठी भक्त आपल्या गावाकडे निघालेत... मात्र गावाला जाणाऱ्या याच प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट सुरु आहे... नियमित तिकीट दराच्या तुलनेत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करण्यात येतेय.... या भाडेवाढीमुळे महागाईचे चटके सोसणाऱ्या गणेशभक्तांचा खिसा आणखी कापला गेलाय..