Rajan Vichare Full PC Thane : मस्केंना म्हणाले उंदीर, शिंदेंना थेट धमकावलं; विचारेंनी सगळंच काढलं
ठाणे: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत, मला जास्त बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या असा सज्जड दम ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तुमच्यासारखा मी गद्दार नाही असा टोलाही विचारे यांनी शिंदेना लगावला. नरेश मस्के (Naresh Maske) हेच आनंद दिघे यांचे खरे चेले असल्याचं वक्तव्य केल्यानंतर राजन विचारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आपण आनंद दिघे यांच्यासोबत 40 वर्षे काम केलंय, त्यावेळी नरेश मस्के कुठे होता? असा सवाल त्यांनी केला.