Raghunath More Death : दिघेंच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, Eknath Shinde यांनी केलं कुटुंबाचं सांत्वन

Continues below advertisement

Raghunath More Death : दिघेंच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, Eknath Shinde यांनी केलं कुटुंबाचं सांत्वन

शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे (७६) यांचे शनिवारी निधन झाले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून मोरे यांची ओळख होती. आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी साभांळली होती.

शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय असायचे. परंतु जिल्हाप्रमुख पदावर असतानाच त्यांचा अपघात झाला होता. त्यांना मोठी दुखापत झाली होती. तेव्हापासून ते राजकारणापासून अलिप्त होते. काही दिवसांपूर्वीच रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद यांचा विरार येथील एका रिसाॅर्टमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. रघुनाथ मोरे यांच्या पश्चात त्यांचे भाऊ, पुतणे, मुली, नातवंड असा परिवार आहे.

-------------------------------------------------

शिंदे भाषण

एक दुखद घटना घडली
मोरे परिवाराच्या दुखात सहभागी आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram