Thane Mumbra Bypass | मुंब्रा बायपास रस्ता आज वाहतुकीसाठी बंद, वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू
मुंब्रा बायपास मार्ग आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान सुरु असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या मुंब्रा खाडीपुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम आज हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.