MNS on Mumbra Mashid : मुंब्र्याच्या डोंगारावरील मशीद हटवा, नाहीतर तिथं हनुमान मंदिर उभारु
abp majha web team
Updated at:
24 Mar 2023 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMNS on Mumbra Mashid : मुंब्र्याच्या डोंगारावरील मशीद हटवा, नाहीतर तिथं हनुमान मंदिर उभारु
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात ' लाव रे तो व्हीडीओ' द्वारे मुंबईतील माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झालेली आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून ७ ते ८ अनधिकृत दर्गे उभारल्याची माहिती ठाणे शहर मनसेने उघडकीस आणली आहे. तसेच मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद व दर्गे १५ दिवसात हटवा अन्यथा या ठीकाणी हनुमान मंदिर उभारू असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. दरम्यान, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मनसेने निवेदन दिले आहे.