Manoj Jarange Full Speech Thane : भुजबळांना महत्त्व देत नाही; कारण त्यांनी पातळी सोडली - मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Full Speech Thane : भुजबळांना महत्त्व देत नाही; कारण त्यांनी पातळी सोडली - मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) अनेक सभांना उशीर झाल्याने पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, यावरूनच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातून सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम्ही शांत राहूनही आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे, सरकारला राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवायची नाही का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आम्ही कायदा सुव्यवस्था कायम राखत असताना देखील आमच्यावर गुन्हे का दाखल केले जात आहे? असाही सवाल जरांगे यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "शांत राहा म्हणून आम्ही समाजाला सांगत आहे. मात्र, दुसरीकडे तुम्ही आमच्यावर गुन्हे ठोकत आहे. सगळीकडे असेच गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे, सरकारला हा आमचा प्रश्न आहे की, तुम्हीच यांना पुढे करत आहेत का?, माझा हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे. तसेच, सरकारलाच दंगली भडकावून आणायच्या आहेत का? असाही सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola