Yerwada Jail: येरवडा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचं पत्र 'माझा'च्या हाती,पत्रात नेमकं काय?

Continues below advertisement

Yerwada Jail: येरवडा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचं पत्र 'माझा'च्या हाती,पत्रात नेमकं काय? ड्रग माफिया ललित पाटीलला मदत करण्यात येरवडा कारागृह प्रशासन देखील सहभागी असल्याचं समोर आलंय . कारण येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरने लिहलेलं एक पत्र ए बी पी माझाच्या हाती लागलंय  . तीन जून २०२३ च हे पत्र ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना उद्देशून लिहण्यात आलंय . या पत्रात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधीक्षक ललित पाटीलला उपचारांसाठी ससून रुग्णालयात भरती करून घेण्याची आणि किमान १५ दिवस त्याला तिथंच ठेवण्याची विंनती केलीय. ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पुन्हा येरवडा कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नसल्यानं ललित पाटीलला ससून रुग्णालयातच १५ दिवस ठेऊन घेण्यात यावं असं या पत्रात नमूद करण्यात आलंय . या पत्रावर ससूनच्या चीफ मेडिकल ऑफिसरची आणि कारागृहातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साह्या आहेत . त्यामुळं ललित पाटीलला फक्त ससूनमधील डॉक्टर आणि पुणे पोलीस यांचीच मदत मिळत होती असं नाही तर येरवडा कारागृहातील अधिकारीही त्याच्या पाठीशी होते हे या पत्रांतून सिद्ध होतंय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram