Mahesh Ahir Call Recording : मी स्वत:वर फायरींग करुन घेईल आणि आव्हाडांचं नाव घेईल Audio Clip Viral

"मी स्वत:वर फायरींग करुन घेईल आणि आव्हाडांचं नाव घेईल", महेश अहिरांची रेकॉर्डींग व्हायरल

ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या नावे काही कथित ऑडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये कथित ऑडिओ मधील व्यक्ती मी स्वतःवर फायरिंग करून घेईन मग मी जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेईन माझ्यामागे खुद्द मुख्यमंत्री उभे आहेत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच एका ऑडिओ मध्ये सीएमच्या मार्गदर्शनात काम करत असल्याचा देखील ऑडिओ मध्ये उल्लेख असल्याचा समोर आला आहे. हे सर्व ऑडिओ नुकताच पुणे महानगरपालिकेच्या बाहेर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांनी ट्विट केले आहेत. तसेच लवकरात लवकर महेश आहेर याच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. सदर ऑडिओ ची एबीपी माझा पुष्टी करत नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola