Kalyan Crime : कल्याणमध्ये अत्याचारानंतर हत्या, आरोपीवर राजकीय वरदहस्त, नागरिकांचा मूक मोर्चा

Continues below advertisement

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी पीडित मुलगी घरातून खाऊ आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर तिचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी, त्याची बायको आणि रिक्षावाला  या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातील आरोपी गवळी हा कल्याण परिसरातील गुंड आहे. त्याच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आरोपीवरती यापूर्वी पोक्सोसह विनयभंगाचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपीने पिडितेवर अत्याचार आणि हत्या केल्यानंतर आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर एका बारमध्ये दारू घेतानाचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. 

कल्याण परिसरातील अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून हत्या केलेल्या मुख्य आरोपीचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर आरोपी विशाल गवळी याने कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका बार मध्ये दारू घेतानाचे हे फुटेज आहेत. अल्पवयीन मुली सोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून येत आहे.संबधित घटना उघडकीस आल्यानंतर कल्याण परिसरात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर संतप्त नागरिकांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. दरम्यान बदलापुरची घटना ताजी असतानाच आणि संतप्त नागरिकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कोळशेवाडी पोलीस ठाणे परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram