ABP Majha Headlines : 07 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला आवडेल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून इच्छा व्यक्त, खाण उद्योगाच्या मलिद्यासाठी पालकमंत्रीपदाचा खटाटोप, राऊतांनी केला होता आरोप

लोकसभेनंतर टी-२० जिंकल्यानंतर आता टेस्ट मॅच जिंकणार, पाच वर्षे कारभार पूर्ण करण्याचा फडणवीसांचा निर्धार, शह काटशहचं राजकारण करत नसल्याचं म्हणत पवारांना टोला

सुप्रीम कोर्टातील प्रलंबित सुनावणीनंतर महापालिका निवडणुका, मुख्यमंत्र्यांकडून अप्रत्यक्ष जानेवारीनंतरचा मुहू्र्त जाहीर 

बदलापूर घटनेपेक्षाही कल्याणमध्ये वासनांध हैवानानं ओलांडली क्रौर्याची सीमा, अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या, आरोपीला फाशीच्या शिक्षेचं श्रीकांत शिंदेंचं आश्वासन

ओळख लपवण्यासाठी नराधम विशाल गवळीनं दाढी काढली, मात्र शेगावच्या सलूनमध्ये पोलिसांकडून बेड्या, मृतदेह लपवण्यासाठी मदत करणाऱ्या पत्नीलाही अटक

अनावश्यक खर्च टाळा, अर्थ खात्याची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या अजित पवारांच्या सूचना, डीपीडीसीच्या कामांचा फेरआढावा घेण्याचाही सल्ला

लाडक्या बहिणींना पंधराशे देऊन नवऱ्यांना दारूडे करण्याची योजना, दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणार असल्याच्या चर्चेनंतर राऊतांचा टीकेचा बाण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram