Kalwa Hospital Thane: ठाण्यात मृत्यू तांडव; 10 तासांत 18 मृत्यू; जबाबदार कोण ?

Continues below advertisement

Kalwa Hospital Thane: ठाण्यात मृत्यू तांडव; 10 तासांत 18 मृत्यू; जबाबदार कोण ?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच शनिवारी रात्री मृत्यूतांडव घडलं. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० तासांत तब्बल १८ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरे डॉक्टर आणि रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ यामुळे १८ रुग्णानी आयुष्य गमावलं. मृत्यू झालेल्या १८ पैकी १४ रुग्ण हे आयसीयूमधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, रुग्णालयाच्या डीनचं दुर्लक्ष झालं का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताय..सर्वात आधी एबीपी माझानं ही बातमी दाखवली. त्यानंतर सुस्त झालेल्या प्रशासनाला जाग आली आणि कारवाईला सुरुवात झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram