Thane : ठाण्यात विवियाना मॉल राडाप्रकरणी Jitendra Awhad यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये काल प्रेक्षक हर हर महादेव सिनेमा पाहण्यासाठी आले. मात्र या प्रेक्षकांना पॉलिटिकल पिक्चर पाहायला मिळाला... संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव सिनेमावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीनेही या वादात उडी घेतली. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं. यावेळी तेथील मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये प्रंचड हाणामारी देखील झाली. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मध्यस्थी केली. मात्र या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. राष्ट्रवादीच्या या आंदोलनानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना मॉल गाठलं आणि चित्रपटाचा शो पुन्हा सुरू केला.. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करून दाखवा असं थेट आव्हान आव्हाडांना दिलं. विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola